आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आमिष दाखवून ९ लाखांना गंडा; शाळा अध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील एका उर्दू प्राथमिक शाळेत नोकरी लावतो, असे सांगून नऊ लाख ७० हजार रुपये घेऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी शाळेच्या अध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेबूब मुर्तुजा लोकापल्ली यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. 


शाळेचे अध्यक्ष अनिस अहमद बंदगी वडगेरी, माजी चेअरमन कासीम वडगेरी, सचिव जाहिदा बेगम वडगेरी, नवशाद बाशामियां सौफी, महिबूब तांबोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फेब्रुवारी २००९ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत ही घटना घडली आहे. महेबूब लोकापल्ली यांची पत्नी शबनम महेबूब लोकापल्ली यांना उर्दू प्राथमिक शाळेत नोकरीला लावतो म्हणून नऊ लाख ७० हजार रुपये संबंधितांनी घेतले. मात्र, नोकरी न लावली फसवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...