आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक करणाऱ्या राज्य, देशातल्या सरकारला गाडा : अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड -  देशातील व राज्यातील जनतेची भाजप शिवसेना सरकारने फसवणूक केली आहे. महापुरुष व महिलांबाबत बेताल वक्तव्ये करून अवमान करणाऱ्या मस्तवाल सरकारला गाडून टाका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केले.


नायगाव येथे आयोजित जनसंघर्ष सभेत ते बोलत होते.  जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.  या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नसीम खान, हर्षवर्धन पाटील, आमदार मधुकर चव्हाण, बस्वराज पाटील आदी उपस्थित होते.   विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे.

 

या सरकारने केवळ १८० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामुळे हे सरकार झोपलेले आहे. त्यांना उठवण्यासाठी आम्ही ही संघर्ष यात्रा काढली. प्रास्ताविक आमदार वसंतराव चव्हाण यांनी केले. या वेळी हर्षवर्धन पाटील, नसीम खान, चारुलता टोकस, डॉ. राजू वाघमारे यांचीही भाषणे झाली. नांदेड येथील नवा मोंढा मैदानावरही जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले. रात्री उशिरा ही सभा सुरू झाली. या सभेतही चव्हाणांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

बातम्या आणखी आहेत...