आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव आरटीओची फसवणूक, पाच जणांविरुद्ध गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बनावट नाहरकत प्रमाणपत्र व दस्ताऐवजासह बनावट वाहन क्रमांक देऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. यात याच विभागातील एका वरिष्ठ लेखापरीक्षकाचा समावेश आहे. 


वाहनांच्या परवानगीसाठी बनावट नाहरकत प्रमाणपत्र व व्यवहारातील इतर दस्ताऐवज तयार करुन आरोपींनी सहा चारचाकी वाहनांना परवानगी दिली आहे. या प्रकरणात दिनेशचंद्र हरिश्चंद्र कुलमते (वरिष्ठ लेखापरीक्षक, नागपूर ग्रामीण), शेख अब्दुल शेख गफ्फार (सरदार कॉलनी, एरंडोल), शेख रफिक शेख सांडू (सरदार कॉलनी,एरंडोल), विजय ओंकार शर्मा (मारुती मंदिर, चाळीसगाव), नसलीम खान जमील खान (भिलपुरा, सुन्नी मशिदजवळ) या आरोपींचा सहभाग आढळून आला आहे. 


या सर्व संशयितांनी बनावट स्वाक्षरी, शिक्के, नाहरकत प्रमाणपत्र सादर करुन एमएच- ४० एके- ३९९८, एमएच- ४० एन- २६४६, एमएच- ४० एन- ४९४४, एमएच- ४० एके- ८८२०, एमएच- ४० एके- ७२९८, एमएच- ४० एके- २५९७ या वाहनांचे हस्तांतरण केले अाहे. यासाठी बनावट स्वाक्षरी व शिक्के बनवून उपप्रादेशिक विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयीन अधीक्षक धनसिंग रुपसिंग इंगळे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...