INSIDE PHOTOS : / INSIDE PHOTOS : करिअरच्या सुरुवातीला मुंबईत भाड्याच्या घरात राहिली दीपिका, नंतर खरेदी केले आलिशान घर

Nov 10,2018 12:30:00 AM IST


मुंबईः बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करुन आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. 9 नोव्हेंबर 2007 रोजी तिचा 'ओम शांती ओम' हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला होता. पहिल्याच चित्रपटातून दीपिकाला यशाची चव चाखायला मिळाली होती. अभिनेता शाहरुख खानसोबत या चित्रपटात तिने काम केले होते. अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल झालेली दीपिका सुरुवातीची काही वर्षे भाड्याच्या घरात राहिली होती. पण 8 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 साली तिचे मुंबईत स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न पूर्ण झाले. 2010 मध्ये तिने Beau Monde टॉवरच्या 26 व्या मजल्यावर तिने स्वतःचे अपार्टमेंट खरेदी केले होते.

दीपिकाचा हा 4 BHK अपार्टमेंट 2776 स्वे. फूट आहे. 2012 च्या आर्किटेक्चरल डाइजेस्ट मॅगझिनच्या पहिल्या इशूसाठी दीपिकाने घरात खास फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये दीपिकाच्या लॅव्हिश अपार्टमेंटची झलक बघायला मिळते. विनीता चैतन्य यांनी दीपिकाच्या या सुंदर घराचे इंटेरिअर डिझाइन केले होते.


दीपिकाला इंडस्ट्रीत 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बघुयात, तिच्या आलिशान घराची खास झलक...

X