आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LPG गॅस सिलिंडरचीही असते Expiry date, वाचा.. कुठे लिहिली असते उत्पादनची अंतिम तिथि

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जे गॅस सिलिंडर वापरत आहात ते खरंच वापरण्यायोग्य आहे की नाही. माहीत नसेल तर आजच तुम्ही जाणून घ्या. सिलिंडर चेक कसे करतात, त्याची प्रोसेस काय असते. आज प्रत्येकांच्या घरात गॅस आले आहेत, ते वापरताना कोणती दक्षता घ्यावी, हे काही जणांना माहीत नसते. प्रत्येक सिलिंडरची अंतिम तारीख असते. त्यानंतर सिलिंडरची तपासणी होते. तपासणीमध्ये सिलिंडर वापरण्यायोग्य नसेल तर ते रिजेक्ट करण्यात येते.       

 

किती वर्षांनी करावी लागते तपासणी? 
कोणत्याही नवीन गॅस सिलिंडरची 10 ते 15 वर्षांनी टेस्टिंग करण्यात येते. जुन्या सिलिंडरची 5 वर्षांमध्ये टेस्टिंग करणे आवश्यक असते. तशी दक्षता एजन्सी घेत असतेच पण कधीतरी असे रिजेक्टेड सिलिंडर बाजारात येण्याची शक्यता जास्त असते. 

 

कुठे केले जाते सिलिंडरची तपासणी...

गॅस सिलिंडर प्लॉन्टमध्ये सिलिंडरची तपासणी केली जाते. काही ग्राहक अनेक वर्षे सिलिंडरचा वापर करत नाहीत. अशा सिलिंडरची टेक्निकल पडताळणी करणे आवश्यक असते. पडताळणी न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. 

 

कसे तपासाल आपले सिलिंडर वापरास योग्य आहे की, अयोग्य... 
- सिलिंडरवर असणाऱ्या तीन पाट्यांपैकी एका पट्टीवर कोड लिहिलेला असतो.  
- तो कोड A,B,C,किंवा D ने सुरु होतो.  
- A  म्हणजे मार्च (प्रथम तिमाही), B  जून (द्वितीय तिमाही), C म्हणजे सप्टेंबर (तृतीय तिमाही), आणि D डिसेंबर (चतुर्थ तिमाही) 
-  काही सिलिंडरवर D -06 लिहिलेले असते. याचा अर्थ डिसेंबर 2006 असा होतो. म्हणजेच त्याची तपासणी करणे अत्यावश्यक असते.

बातम्या आणखी आहेत...