आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीच्या कागदपत्रांची तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या आठवड्यात मी माझ्या परिवारासह कोकणातल्या आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेलो होतो. अधिकृत टॅक्सीमधून आम्ही प्रवास करीत होतो, तेव्हाचा हा अनुभव! उत्साहाच्या वातावरणात आमचा प्रवास सुरू होता; पण पोलादपुराजवळ आमच्या आनंदावर विरजण पडले. बहुधा ते महामार्ग पोलिस असावेत. त्यांनी आमची टॅक्सी अडवली आणि आमच्या चालकाला बाजूला घेऊन गेले. त्यांचं काही बोलणं झालं. चालक परत आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर म्हणाला, ‘त्यांनी गाडीची कागदपत्रे तपासली.’ कशेडी घाटातही पुन्हा तोच अनुभव आला. प्रत्येक वेळी किमान 10 ते 20 मिनिटे तरी वाया जाऊ लागली.

कोकणाकडे जाताना तीनदा आणि परतीच्या मार्गावर दोनदा अशा एकूण पाच वेळा याच अनुभवाची पुनरावृत्ती झाली. योगायोगाने कोकणातल्या प्रवासात (बहुधा दिवेआगर-श्रीवर्धन मार्गावर)शेखाडी नावाचे एक लहानसे गाव अगदी समुद्रकिना-या लगत लागते. दहशतवाद्यांनी याच किना-या वर आरडीएक्स उतरवल्याचे आठवले. पुढे ते प्रकरण बरेच गाजल्याचेही आठवले. या प्रवासात माझ्यासोबत माझे मोठे बंधू, वहिनी, माझी दोन उच्चशिक्षित मुले, सुना असा परिवार होता. प्रत्येक ठिकाणी वेळ वाया जात असल्याने माझ्यासह गाडीतील सर्वांना खूप मनस्ताप झाला. गाडीची कागदपत्रे तपासण्यासाठी प्रत्येक वेळी एका बाजूलाच का जावे लागत होते? रहदारीस अडथळा होण्याची त्यांना भीती वाटत होती काय? जेव्हा आरडीएक्स खरोखरच उतरवले गेले होते, तेव्हा अशाच प्रकारचे चेकिंग केले गेले होते का? आम्ही वारंवार पोलिसांना विनवण्या केल्या. पण आमचे ऐकणार कोण? या कटकटीपासून सुटका करून घेण्यासाठी मी राजकीय क्षेत्रातील एका बड्या प्रस्थाला फोन लावला. पण ते एक रूटीन चेकिंग असते, ते करावेच लागते, असे सांगून त्यांनी फोन ठेवला. नाही तेव्हा स्वत:ची गाडी लाल सिग्नल असतानाही तो तोडून पुढे जाणा-या या राजकारण्यांचा स्वभाव मी ओळखून होतो. खरं तर माझ्या मनात अजूनही खूप कोडी आहेत; पण सध्या यापैकी एखाद्याचंच उत्तर जरी मिळालं तरी खूप आहे!