आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांसर प्रेयसी होती दुसऱ्याच्या संपर्कात, प्रियकराने अॅसिड समजून तरूणीवर केला केमिकल हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - 21 वर्षीय तरूणीवर तिच्या प्रियकराने केमिकल हल्ला केल्याची घटना मंगळवारी शहरात घडली. यामुळे तरूणीच्या डोळ्यांचे तेज गेले आहे. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपी तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेयसी मला सोडून दुसऱ्या लोकांच्या संपर्कात राहत होती, त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठई तिचा चेहरा बिघडवण्याचा प्रयत्न केला असे आरोपीने पोलिसांना सांगितले.


तरूणीच्या डोळ्यावर परिणाम...
विद्या पॅलेस कॉलनी येथील रहिवासी असलेला महेंद्र उर्फ मोनू सेन असे आरोपीचे नाव आहे. एएसपी इस्ट झोन-3 येथील प्रशांत चौबे यांनी सागितले की, डॉक्टरांनुसार तरूणीवर अॅसिड नाही तर एखाद्या केमिकलचा अटकॅ झाला आहे. यामुळे तिच्या चेहऱ्यावर आग झाली. पीडितेच्या चेहऱ्यावर जळाल्याचे किंवा फोड आल्याचे कोणतेही निशान नाही. डोळ्यात आग होत असल्याने कमी दिसत आहे.


दोन वर्षांपासून लग्नासाठी टाकत होता दबाव...
आरोपीचे हेअर सलून आहे, तर तरूणी एका डांस ग्रुपशी जोडलेली आहे. आरोपीशी तिची ओळख सहा वर्षांपूर्वी एका डांसक्लासमध्ये झाली होती. तरूणी शहराच्या बाहेर देखील डांसचे शो करते. काही दिवसांपासून आरोपीला संशय होता की, ती त्याला सोडून दुसऱ्या लोकांच्या संपर्कात आहे. काही दिवसानंतर तरूणीला शोसाठी वृंदावन आणि 22 फेब्रुवारीला अमेरिकेला जायचे होते. तिने आपल्यापासून दूर जाऊ नये असे आरोपीला वाटत होते. दोन वर्षांपासून तो तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. तरूणीने त्याचे ऐकले नाही. त्यामुळे त्याने केमिकल अटॅक केला. आरोपीने सांगितले की, शीशीमध्ये जे केमिकल मिळाले ते त्याने डिस्पोजल ग्लासमध्ये टाकले आणि तरूणीच्या चेहऱ्यावर फेकले. अटॅक करताना त्याने चेहऱ्यावर रुमाल बाधला होता.

 

बातम्या आणखी आहेत...