आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बीजिंग - चीनमधील एका रासायनिक प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात किमान ४७ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदतकार्याद्वारे पीडितांचा शोध घ्यावा आणि त्यांनी योग्य ती मदत देण्यात यावी, असे आदेश युरोप दौऱ्यावरील राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत. स्फोट व आगीनंतर ८८ लोकांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात यश मिळाले. स्फोट एवढा भयंकर होता की त्यात परिसरातील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. स्फोटामुळे भूकंपासारखे हादरे जाणवले. त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक मृत्युमुखी पडले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जिआंग्सू प्रांतात गुरुवारी यांचेंग येथील रासायनिक आैद्योगिक पार्कमध्ये ही घटना घडली. घटनेत ६४० लोक गंभीर जखमी झाले आहेत. जिआंग्सू टिआनजियाई केमिकल कंपनीच्या मालकीचा हा प्रकल्प आहे. २००७ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. या कंपनीत हायड्रोक्झिबेन्झोइक रसायनाचे उत्पादन केले जाते.
औद्योगिक परिसरातील १६ उद्योगांना या स्फोटाचा फटका बसला. घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे आदेश शी जिनपिंग यांनी दिले. शी सध्या पाच दिवसांच्या युरोपीय दौऱ्यावर असून त्यांनी पीडितांच्या मदतीसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दुसरीकडे यांंचेंग येथील सुमारे १० शाळांना सुटी देण्यात आली आहे. परिसरातील सुमारे ४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
चार किमी भागात विषारी हवा..
प्रकल्पातील आग विझवण्यासाठी १४ तांस लागले. रसायनांच्या गळतीमुळे चार किमी परिसरातील हवा विषारी बनली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.