आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकुनगुन्या उपचारात चिंंचेच्या बिया उपयोगी: IIT च्या प्राध्यापकांनी शाेधले बियांतील अँटिव्हायरल प्राेटीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशासह जगभरात अधूनमधून धुमाकूळ घालणारा जीवघेणा अाजार चिकुनगुन्यामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले असून, अजूनही बरेच जण त्याचा सामना करत अाहेत. डासांमुळे पसरणाऱ्या या तापजन्य अाजारावर अद्यापही म्हणावी तशी प्रभावी अाैषधे शाेधली किंवा निर्माण केली गेलेली नाहीत. त्यासाठी जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, संशाेधक अादी प्रयत्नशील अाहेत; परंतु त्यांना त्यात म्हणावे तसे यश अालेलेे नाही.

 

तथापि, रुरकी अायअायटीच्या दाेन प्राध्यापकांनी चिकुनगुन्याच्या अाैषधाेपचारात साह्यभूत ठरतील असे चिंचेच्या बियांतील प्राेटीन शाेधण्यात यश मिळवल्याचा दावा केला अाहे. चिंचेच्या बियांमध्ये या राेगाचा सामना करण्यास सक्षम असलेले अँटिव्हायरल गुण असल्याचे त्यांनी म्हटले अाहे.  


जगभरात विशेषत: भारतात चिंचेची झाडे माेठ्या प्रमाणावर अाढळून येतात. चिंचेचा जसा इतर खाद्यपदार्थांत वापर केला जाताे, तसेच चिंंचेसह त्यांच्या बियांमध्येही अायुर्वेदिक अाैषधी गुण असल्याचे या प्राध्यापकांनी केलेल्या संशाेधनातून समाेर अाले. 


चिंच, त्याच्या बिया, पाने व सालीचा उपयाेग पाेटदुखी, वांत्या, अतिसार, जीवाणू संक्रमण, जखम लवकर भरण्यासह अॅसिडिटी, सूज अादींवर केला जाताे. त्यामुळे यातील अँटिव्हायरल संरचनेसह अधिक संशाेधन व प्रयाेग करण्यासाठी त्याचे पेटंटदेखील दाखल केले अाहे , असे प्रा.शैली तोमर यांनी सांगितले. चिंचेच्या बियांत लॅक्टिन नावाचे प्रोटीन असते व ते ग्लायकन शर्करेच्या निर्मितीशी निगडित असते. याचा राेगप्रतिबंधक तत्त्व म्हणून एचआयव्ही, एचपीव्हीसह संंसर्गजन्य अाजारांत उपयाेग केला जाताे. यातील एन-अॅसिटाइलग्लुकाेसमिनमुळे (एनएजी) शरीराच्या पेशींमधील अाजार पसरवणाऱ्या जीवाणूंना राेखता येऊ शकते, असे संबंधित प्राध्यापकांनी त्यांच्या अभ्यासातून दाखवून दिले. 


यासाठी संशोधकांनी  चिंचेच्या बियांतील लॅॅक्टिन वेगळे केले. त्यानंतर एंझाइम-लिंक्ड इम्युनो सोर्बेंट एसे (एलिसा) नामक प्रक्रियेद्वारे लॅक्टिनवर अभ्यास केला.  या संशोधनामुळे चिकुनन्या रुग्णांना मोठा लाभ होऊ शकतो.

 

चिकुनगुन्या व्हायरसचा प्रभाव हाेताे कमी  
या संशाेधनात चिकुनगुन्याच्या व्हायरसचा प्रभाव अाैषधाेपचारात लॅक्टिनचा समावेश केल्याने ६४ % कमी झाल्याचे दिसले. तसेच पेशींमधील व्हायरल आरएनएचा स्तरदेखील ४५ % कमी झाला. या अभ्यासात एनएजीसाठी विशिष्ट चिंचेच्या बियांतील लॅक्टिनचा अँटिव्हायरल म्हणून उपयोगाचे प्रथमच मूल्यांकन व अाजार वाढवणाऱ्या व्हायरसला पहिल्या टप्प्यातच राेखण्याची क्षमता तपासली गेली, असे प्रा.प्रवींद्रकुमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...