आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रियासी- जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल यंदा जुलैपर्यंत तयार होईल. हा सेतू बक्कल व कौडीदरम्यान तयार करण्यात येत आहे. १३१५ मीटर (१.३ किमी) लांबीचा रेल्वे पूल नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंचीवर आहे. सेतूची उंची जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा (३२४ मीटर) ३५ मीटरने जास्त आहे. पुलाचा झुलता भाग ४६७ मीटर लांबीचा आहे. तो १७ केबलवर अवलंबून असेल. या पुलावर दोन रेल्वे मार्ग असतील. एकाची रुंदी १४ मीटर असेल. त्याशिवाय दोन्हीच्या मध्ये १.२ मीटर रुंदीचा एक मार्ग असेल. या पुलाची निर्मिती कोकण रेल्वे उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेललिंक प्रकल्पा अंतर्गत केली जात आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर केले आहे. सेतूच्या निर्मितीवर सुमारे १२०० कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पात कोकण रेल्वेच्या देशातील १५ मोठ्या संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याशिवाय ५ हजार कामगार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर व्यग्र आहेत. २००४ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सध्या जगातील सर्वात उंच पूल फ्रान्सच्या तरन नदीवर प्रस्तावित आहे. या पुलाच्या स्तंभाची उंची ३४० मीटर आहे.
रेल्वेच्या माध्यमातून काश्मीर देशाशी जोडले जाईल
-१११ किमी लांबीच्या कटरा व बनिहाल मार्गावर रेल्वे पूल तयार करण्यात आल्यास काश्मीर रेल्वेने थेट उर्वरित देशाशी जोडला जाईल. सध्या बनिहाल व बारामुलादरम्यान रेल्वे मार्ग आहे. कटरा-बनिहालदरम्यान रेल्वे सेेवा नाही.
-हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने सेसमिक झोन-४ मध्ये समाविष्ट होते. त्यामुळे पुलास सिसमिक झोन-५ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
तंत्रज्ञान : पुलाच्या व्यवस्थेत ऑनलाइन निगराणी, आणीबाणीत इशारा देणारी यंत्रणा
चिनाब पुलाच्या निर्मितीत झुलत्या तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. पुलावरील हा भाग गतवर्षीच तयार झाला.
पूल ताशी २६६ किमी वेगवान वाऱ्याचाही मुकाबला करू शकतो. त्यात स्फोटक प्रतिबंधक स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
या पुलावर ऑनलाइन मॉनिटरिंग अँड वॉर्निंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यासाठी डीआरडीओ, कोकण रेल्वेचेही सहकार्य घेण्यात आले आहे. स्फोटक प्रतिबंधक यंत्रणा आहे. त्यामुळे मोठ्या दाबाचा परिणाम दिसून येणार नाही. पुलाच्या निर्मितीत २९ हजार मेट्रिक टन पोलाद लागेल. एका मार्गावरून १८ डब्यांची गाडी धावू शकेल.
वैशिष्ट्ये : कोकण रेल्वेचे ५२ किमी मार्ग बनवण्याचे उद्दिष्ट, १७ बोगदे, २३ पूल
-उधमपूर-श्रीनगर-बालामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प ३४५ किमी लांबीचा आहे. चिनाब पूल त्याचा महत्त्वाचा भाग आहे.
-कटरा ते धरम यामधील भागाची लांबी सुमारे १०० किमी आहे. त्यापैकी ५२ किमीचा रेल्वे मार्ग तयार करत आहे. त्यात ४६.१ (८६ टक्के) भुयारी मार्ग, ५ किमी (९ टक्के) पूल असेल.
-या मार्गावर १७ बोगदे. सर्वात लांब बोगदा ९.३ किमी लांबीचा आहे. २३ पूल आहेत. त्यात सर्वात उंच पूल ९१ मी. आहे.
-कोकण रेल्वेने १५२ किमी रस्त्यांच्या निर्मितीचे काम केले आहे. झुलत्या भागाच्या निर्मितीत केबल कारचा उपयोग केला आहे. ही कार ५५ मिमी मीटर केबलवर चालते. त्याची भिस्त १२७ स्तंभांवर आहे.
-३५९ मीटर उंच पुलाच्या निर्मितीत कोकण रेल्वेसह देशातील १५ मोठ्या संस्थांचा हातभार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.