• Home
  • National
  • Chennai Techie Subhasri Ravi Death after AIADMK Leader C Jayagopal Hoarding collapsed, Madras HC

Illegal Banners / अन्ना द्रमुकचे बॅनर कोसळून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; अवैध होर्डिंग्सवरून मद्रास हायकोर्टाने सरकारवर ताशेरे

होर्डिंग्स पडल्याने तरुणीचा मृत्यू; अजुन किती रक्त सांडणार? हायकोर्टाचा सवाल

Sep 13,2019 05:42:00 PM IST
चेन्नई - तामिळनाडूत सत्ताधारी अखिल भारतीय अन्ना द्रविड मुन्नेत्र कडघम (अन्नाद्रमुक)चे बॅनर कोसळून एका 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पीडित तरुणी आर सुबाश्री (23) एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. ती रस्त्यावरून जात असताना अचानक सत्ताधारी पक्षाचे होर्डिंग पडले. यानंतर तिचे संतुलन बिघडले आणि मागून येणाऱ्या भरधाव टँकरखाली ती चिरडली गेली. मद्रास हायकोर्टाने या घटनेची गंभीर दखल घेतली. अवमानना याचिकेवर सुनावणी घेताना किती लिटर रक्ताने रस्ते रंगणार आहात? असा सवाल देशभरातील प्रशासनाला केला. देशातील नौकरशहांच्या उदासीन वर्तनामुळे आयुष्याला काहीच मोल राहिलेले नाही. आमचा या सरकारवरून विश्वास उडाला अशा शब्दांत कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.
X