Home | Sports | From The Field | Chennai's 112th T20 victory; equal with Mumbai, with the highest wins

चेन्नई संघाचा ११२ वा टी-२० विजय; सर्वाधिक विजयांसह मुंबईशी बराेबरी

वृत्तसंस्था | Update - Apr 15, 2019, 09:48 AM IST

चेन्नई सुपरकिंग्जची काेलकात्यावर ५ गड्यांनी मात

  • Chennai's 112th T20 victory; equal with Mumbai, with the highest wins

    काेलकाता - गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यंदाच्या १२ व्या सत्रातील अायपीएलमध्ये सातव्या विजयाची नाेेंद केली. चेन्नईने लीगमधील आपल्या आठव्या सामन्यात रविवारी दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्स संघाचा पराभव केला. धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पाच गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नईने गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवता आले. चेन्नईचा हा ११२ वा टी-२० विजय ठरला. यासह सर्वाधिक विजयात चेन्नईने मुंबईची बराेबरी साधली. तसेच चेन्नई संघाने ईडन गार्डनवर सातव्यांदा लक्ष्याचा पाठलाग केला. यासह टीमने येथील मैदानावर सातव्या विजयाची नाेंद केली. या दाेन्ही संघांमधील हा या मैदानावरचा नववा सामना ठरला.


    यजमान काेलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने ५ गड्यांच्या माेबदल्यात १९.४ षटकांत विजयश्री खेचून आणली. चेन्नईच्या विजयात सुरेश रैनाचे (नाबाद ५८) माेलाचे याेगदान राहिले. त्याने नाबाद अर्धशतक साजरे झळकावत टीमचा विजय निश्चित केला. यादरम्यान फाफ डुप्लेसिस (२४), केदार जाधव (२०) आणि रवींद्र जडेजाने (नाबाद ३१) माेलाची खेळी केली. त्यामुळे चेन्नईला आपली विजयी माेहीम अबाधित ठेवता आली. काेलकाता संघाकडून पीयूष चावला आणि सुनील नरेनने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.

Trending