Home | Business | Business Special | chepeast cloth market in India

फक्त 20 रूपयांत शर्ट आणि टॉप, तर 50 रूपयांत Jeans पँट, हे आहेत भारतातील स्वस्त कपडा मार्केट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 01:48 PM IST

येथे तुम्ही किलोच्या भावाने कपडे घेऊ शकता

  • chepeast cloth market in India

    नवी दिल्ली- तुम्हाला माहिती आहे का...? देशेत अनेक असे मार्केट आहेत जिथे अतिशय कमी किमतीत कपडे मिळतात. जाणून घ्या अशा काही मार्केट्सबद्दल जिथे किलोच्या भावाने कपडे मिळतात.


    दिल्लीचे कॅनॉट प्लेस-

    मजनू का टिला, रघुबीर नगर, करोल बाग, इंद्रपुरी, इंद्रलोक, भरत नगर, लाल किला, चांदनी चौक, पश्चिम पुरी, ईस्ट दिल्लीसारख्या भागात सेकंड हँड कपडे मिळतात. ईस्ट दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी किलोच्या भावाने कपडे मिळतात.


    या वस्तू मिळतात स्वस्त
    या मार्केटमध्ये 20 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत कपडे मिळतात. यात शर्ट, पँट, जिन्स, ड्रेस, सूट-सलवार, जॅकेट इत्यादी कपडे मिळतात. या बाजारातील अनेक दुकानात वेगवेगळी कपडे मिळतात. याठीकाणी तुम्ही बार्गेनदेखील करू शकता. याठीकाणी तुम्ही किलोच्या भावाने कपडे विकत घेऊ शकता. येथे तुम्ही 10 किलोपासून 50 किलोच्या बंडलमध्येही कपडे घेऊ शकता.

    याकारणामुळे आहे स्वस्त कपडे
    भारतात सेकंड हँड कपडे इम्पोर्ट होतात. हे कपडे कोणीतरी वापरलेले असतात. सेकंड हँड कपडे विकत घेणारे व्यापारू या कपड्यांना विकत घेतात आणि त्यांना ड्रायक्लिनींग करून पुढे मार्केटमध्ये विकतात. हे सर्व कपडे भारतात चीनकडून पाठवण्यात येतात. कॉमर्स मिनिस्ट्रीच्या आकड्यांनुसार भारत देशातील टॉप 5 देशांपैकी आहे, जे संकड हँड कपडे इम्पोर्ट करतात.

    मुंबई कोलाबा मार्केट
    मुंबईमध्ये कोलाबा मार्केट आणि क्रॉफोर्ड मार्केटमध्ये स्वस्त दरात कपडे विकल्या जातात. येथे कलरफूल कुर्ते, काफ्तान, जिन्स, शर्ट इत्यादी कपडे मिळतात. क्रॉफोर्ड मार्केटमध्येही स्वस्त कपडे मिळतात. हे कपडे 50 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत मिळतात.

    कोलाबा मार्केट सोबतच, मुंबई चोर बाजार, दक्षिणी मुंबईचे मटन स्ट्रीट, मोहम्मद अली रोड याठीकाणी सेकंड हँड कपड्यांचे मार्केट आहे. हे मार्केट अंदाजे 150 वर्षे जुने आहे. या बाजाराला सुरुवातील शोर बाजार म्हटले जात होते, कारण येथील व्यापारी मोठ्याने आवाज करून कपडे विकत होते. पण इंग्रज या शोरला चोर असा उच्चार करत होते त्यामुळे या मार्केटचे नाव चोर बाजार पडले.


    या वस्तू मिळतात
    येते कपडे, ऑटोमोबाईल्स पार्ट्स आणि ब्रँडेड घड्याळांच्या रेप्लीका आणि विंटेज आणि अँक सामानदेखील मिळते.

    चिकपेटे मार्केट बंगळुरू
    हे मार्केट बंगळुरूच्या चिकपेटे परिसरात रविवारी भरते. येथे तुम्ही स्वस्त दरात कपडे घेऊ शकतात. फक्त कपडेच नाही तर येथे तुम्ही गुड्स, ग्रामोफोन, जुने गॅजेट्स, कॅमरा, अँटीक, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि जिम इक्विमेंटदेखील मिळतात.

  • chepeast cloth market in India
  • chepeast cloth market in India

Trending