आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chetan Bhagat Shared His Tenth Class Mark Sheet And Said 'No One Piece Of Paper Can Define You'

दहावीची गुणपत्रिका शेअर करून चेतन म्हणाला - 'एक कागदाचा तुकडा तुमचे व्यक्तिमत्व उलगडू शकत नाही' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : लेखक चेतन भगतने आपली 10 वीची मार्कशीट ट्विटरवर शेअर करून सांगितले, 'गुणपत्रिका कोणत्याच व्यक्तीविषति पूर्ण माहिती देऊ शकत नाही. त्याने लिहिले, "ही 10 वीची माझी मार्क्सशीट. 76% गुण. मला आठवते, कागदाचा हा तुकडा तेव्हा किती ताकदीचा वाटलं होता जेव्हा मी 15 वर्षांचा होतो, पण साधारण विद्यार्थी होतो, आज हे असंबद्ध आहे. मला आनंद आहे की, माझ्या क्षमता आणि आपला विश्वास यामुळे प्रभावित होऊ दिला नाही. कागदाचा कोणताही तुकडा तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी काहीही सांगू शकत नाही.’’
 
मार्कशीटनुसार, चेतन सीबीएसईमधून 1989 मध्ये 10 वी पासआउट झाला आहे. त्याला जे मार्क मिळाले आहेत ते इंग्रजीमध्ये 76, हिंदीमध्ये 46, गणितात 92, विज्ञानात 92 आणि सामाजिक विज्ञानमध्ये 74 असे आहेत. 
 

 

चेतनचे ट्वीट पालकांना देऊ शकते प्रेरणा... 
चेतन भगतचे हे ट्वीट त्या माता-पितांना प्रेरणा देऊ शकते जे प्रमाणपत्रांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर आपल्या मुलांच्या क्षमता ठरवतात. एक संशोधनानुसार, भगतच्या कादंबऱ्यांच्या 70 लाख कॉपी विकल्या गेल्या आहेत. 2008 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने भगतला “भारताच्या इतिहासमध्ये सर्वात विकले जाणारे इंग्रजी भाषेतील कादंबरीकार” म्हणून मानले आहे. 2010 मध्ये भगतला टाइम मॅगझिनने जगातील 100 सर्वात प्रभावी लोकांच्या यादीमध्ये सामील केले होते. 
 
परीक्षेच्या तणावापासून वाचण्यासाठी, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने या शैक्षणिक सत्रापासून एक खेळाचा तास बंधनकारक केला आहे. हा वर्ग 1 पासून 12 वीपर्यंत आहे. बोर्डाच्या एका सर्कुलरमध्ये लिहिले आहे, ‘यामुळे मुलांचा ताण कमी होईल. शाळेत शिकण्याचे उत्तम वातावरण तयार होईल.’
 
पूर्ण पाठ्यक्रम चार भागांमध्ये विभाजित केला आहे. यामध्ये कोणताही थेअरी क्लास नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी एका उपक्रमात सहभाग घ्यावा लागेल. विद्यार्थी वर्षात आपण निवडलेली अॅक्टिविटी बदलू शकतात.