आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआग्रा - आग्रा शहरापासून 30 किमी अंतरावर छह पोखर गाव आहे. या गावात 200 हून अधिक मुस्लिम परिवार राहतात. या गावाला दफनभूमी नाही. यामुळे येथील प्रत्येक घरात नातेवाईकांचे मृतदेह दफन केले जातात. 1964 मध्ये दफनभूमीची जमीन तलावात गेली होती. यानंतर 80 च्या दशकात प्रशासनाने रेल्वेरुळाजवळ दफनभूमीसाठी जमीन दिली होती. पण कब्रस्तानासाठी दिलेल्या जमिनीवर समाजातील लोकांनी स्वतःचेच घरे बांधले असल्याचे गावचे सरपंच सुंदर यांनी सांगितले. यामुळे त्यांना आता स्वतःच्या घरात कब्र बनवावी लागत आहे.
गावातील सरदार खान सांगतात, की त्यांच्या घरासमोर दीड हजार स्वेअर फूटपेक्षा अधिक जमीन आहे. येथे 10 पेक्षा अधिकांना दफन केले आहे. मागील दीड-दोन महिन्यात 4 कब्र तयार करण्यात आल्या आहेत. घराबाहेरच कब्र असल्यामुळे लग्न करणे कठीण झाले आहे. नातेवाईक देखील येथे येण्यास कचरतात.
जमीन कमी असल्यामुळे पक्की कब्र बनवत नाहीत
गावातील नफीसा सांगते, की आपच्या घरासमोरच आजोबाची कब्र आहे. त्यांची पक्की कब्र बनवली होती पण आता जागा कमी असल्यामुळे आम्ही पक्की कब्र बनवत नाहीत. परिवारातील कोणाचे निधन झाल्यास त्यास अशाचप्रकारे घरासमोर दफन केले जाते. नफीसा पुढे बोलताना म्हणाली, की घरासमोर कब्र असल्यामुळे मुले घाबरतात. कधी एखादी सावली दिसली तरी रडायला लागतात. रात्रीच्या वेळी उठणे आणि घराबाहेर निघण्यात भीती वाटते अशी सध्याची स्थिती आहे.
पहिला घास पुर्वजांच्या नावे
गावातील 60 वर्षीय मुन्नी सांगतात की पुर्वजांच्या कब्र समोरच आमची चूल आहे. आम्ही तेथेच स्वयंपाक बनवतो. पहिला घास दफन केलेल्या पुर्वजांच्या नावे ठेवण्यात येतो. घरात कब्र असल्यामुळे मुले भीतीमुळे कधी-कधी आजारी पडतात. पण जागेची कमतरता असल्यामुळे आम्हाला घरातच कब्र बनवावी लागते.
मोजणी होते पण जमीन मिळत नाही
दफनभूमीच्या जमिनीसाठी गावकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. अधिकाऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांना अनेकवेळा निवेदन दिले. पण लेखापालच्या मोजणीनंतर सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. गावचे सरपंच सुंदर सांगतात की, लेखापाल जमिनीची मोजणी करण्यास आल्यानंतर प्रशासनाने दफन-भूमीसाठी दिलेल्या जमिनीवर मुस्लिम परिवारांनी अतिक्रमण केल्याचे दाखवतात. दरम्यान दफनभूमीसाठी घरे हटवण्याच्या अटीवर कोणीही तयार होत नाही. यामुळे सर्व योजना या निष्फळ ठरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.