आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर 'माताेश्री'लाच तुरुंग करून ठाकरेंना ठेवले असते : छगन भुजबळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भूषण महाले | नाशिक
श्रीकृष्ण आयाेगाने ज्या लाेकांना दाेषी ठरवले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी पक्षाने स्थापनेच्या वेळीच जनतेला दिले हाेते. एका फाइलचा अाधार घेत तत्कालीन पाेलिस आयुक्तांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेची कारवाई केली हाेती. त्यांना त्रास देण्याचा माझा कदापिही हेतू नव्हता. उलट त्या वेळी जर बाळासाहेबांना तातडीने जामीन मिळाला नसता, त्यांना अधिक त्रास नकाे म्हणून गृहमंत्र्यांच्या अधिकाराचा उपयाेग करून मी ठाकरेंचे निवासस्थान 'माताेश्री' हेच तुरुंग करून बाळासाहेबांना तेथेच ठेवण्याचा निर्णय घेणार हाेताे,' असे स्पष्टीकरण तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी 'दिव्य मराठी'ला दिले.

'राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या हट्टामुळे बाळासाहेबांना अटक झाली हाेती, ती राष्ट्रवादीची चूक हाेती,' अशी कबुली अजित पवारांनी दिली हाेती, त्यावरून भुजबळ यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...