आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhapaak Starrer Deepika Padukone Will Her Celebrate Birthday With Acid Attack Servants At Sheroes Cafe In Lucknow

लखनऊमधील 'शीरोज' कॅफेमध्ये अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हरसोबत वाढदिवस साजरा करणार दीपिका पदुकोण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री दीपिका पादुकोण येत्या 5 जानेवारी रोजी आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यास तयार आहे. दिव्य मराठीसोबत खास चर्चेत दीपिकाने तिच्या वाढदिवसाची योजना सांगितली. तिने सांगितले की, यंदा 5 जानेवारी रोजी लखनऊस्थित 'शीरोज' हँगआऊट कॅफमध्ये अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरसोबत ती आपला वाढदिवस साजरा करणार आहे.  


लखनऊ आणि आग्रा येथे या कॅफेच्या दोन शाखा आहेत. या दोन्ही शाखा अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिला चालवत आहेत. या कॅफेमध्ये काम करणा-या चार महिलांनी  'छपाक' चित्रपटातही काम केले आहे. या चौघीही अॅसिड हल्ल्यातून वाचल्या आहेत. हरियाणातील ऋतू सैनीने दीपिकाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. दीपिका विशेषत: येथे या अ‍ॅसिड अटॅकमधून वाचलेल्यांना भेटण्यासाठी येत आहे आणि त्यांचासोबत वाढदिवस साजरा करणार आहे.

रणवीरशिवाय दीपिका येथे पोहोचेल: याविषयी दिव्य मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, 'छपाक'ची प्रॉडक्शन टीम 4 जानेवारीला या कॅफेमध्ये पोहोचेल आणि दीपिका 5 जानेवारीला येथे येणार आहे. दीपिकाच्या वाढदिवसासाठी कोणत्या प्रकारची खास व्यवस्था असेल, तिला कोणती भेट दिली जाणार आणि तिच्या वाढदिवसाच्या सोहळ्याचा केक कसा असेल, याविषयी 3  जानेवारीला फायनल डिसीजन घेतले जाईल. कॅफेमधून कळविण्यात आले आहे की, रणवीरची येथे दीपिकासोबत येण्याची काही योजना नाही.

जीतू, कुंती, बाला आणि ऋतू उपस्थित राहणार: अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर ऋतु सैनी, ज्यांनी 'छपाक' चित्रपटामध्ये दीपिका सोबत काम केले होते, त्यांनी दिव्य मराठीला सांगितले की, वाढदिवसाच्या सोहळ्यात दीपिकासोबत 'छपाक'मध्ये काम केलेल्या चार अ‍ॅसिड सर्व्हायव्हर जीतू, कुंती, बाला आणि मी उपस्थित असू. लखनऊच्या शीरोजमध्ये काम करणा-या सर्व महिला येथे हजर असतील. आम्ही त्यांच्या वाढदिवशी केक कापू आणि तो क्षण खास बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. दीपिका खूपच गोड आहे आणि या चित्रपटात तिच्याबरोबर काम केल्याने खूप वेगळे कनेक्शन निर्माण झाले आहे. तिने आमच्याबरोबर खूप मजा केली.   

बातम्या आणखी आहेत...