आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhapaak: Uttrakhand Government Inspired With Chhapaak, Announced Pension Scheme For Acid Attack Survivors

'छपाक'ने प्रभावित झाले उत्तराखंड सरकार, राज्यातील अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी सुरु करणार पेन्शन योजना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2017 मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सध्याच्या तरतुदी महिलांवरील अ‍ॅसिड हल्ले थांबविण्यात अपयशी ठरल्या आहेत.
  • मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सरकारने 'छपाक' करमुक्त केला आहे.

बॉलिवूड डेस्कः उत्तराखंडच्या भाजप सरकारने दीपिकाच्या 'छपाक' या चित्रपटाने प्रभावित होऊन अॅसिड अ‍टॅक पीडितांसाठी निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. महिला व बालविकास मंत्री रेखा आर्य यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या की, आम्हाला या माध्यमातून पीडितांना मदत करायची आहे, जेणेकरून त्या आदराने जीवन जगू शकतील.


रेखा आर्य यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही हा प्रस्ताव संमतीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवू. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर अ‍ॅसिड अटॅकमधून वाचलेल्यांना दरमहा 5 ते 6 हजार रुपये दिले जातील. हे पैसे त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करतील. आकडेवारीनुसार, राज्यात सध्या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांची संख्या सुमारे 11 आहे.


त्या म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार थांबवावेत आणि स्त्रियांसोबत कसे वर्तन करावे याविषयी मुलांना शिक्षण दिले पाहिजे. चित्रपटावरुन निर्माण झालेल्या वादावर त्या म्हणाल्या की, ही एखाद्याच्या वास्तविक संघर्षाची कहाणी आहे आणि त्या व्यक्तीला काही हरकत नसेल तर त्यास मुद्दा बनवू नये.

बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कामगिरी : 10 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या 'छपाक' चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सरासरी ठिकठाक बजावली आहे. फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.77 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, दुसर्‍या आणि तिस-या दिवशी कमाईच्या आकड्यात थोडी वाढ बघायला मिळाली.  शनिवारचे कलेक्शन शुक्रवारच्या तुलनेत 44.65 टक्के आणि रविवारी 54 टक्के अधिक होते. म्हणजेच शनिवारी चित्रपटाने 6.90 कोटींची कमाई केली. तर रविवारी कमाईचा आकडा 7.35 कोटींच्या घरात होता. 

बातम्या आणखी आहेत...