Kolhapur flood / पुरग्रस्तांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजी राजे खर्च करणार पाच कोटी रुपये; ट्विट करून दिली माहिती

शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित - छत्रपती संभाजी राजे

दिव्य मराठी

Aug 12,2019 01:52:32 PM IST

मुंबई - कोल्हापूरात महापूराने हाहाकार माजवला आहे. यामध्ये हजारो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले. यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. यांसोबत आता छत्रपती संभाजीराजे सुद्धा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कोल्हापूरातील लोकांची मदत करण्यासाठी ते पाण्यात उतरले होते. आता ते पुरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार असल्याची माहिती स्वतः संभाजीराजेंनी ट्विट करुन दिली आहे.


संभाजीराजे यांनी "माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे." असे ट्विट करत मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

छत्रपती संभाजी राजेंचे ट्विट

X