आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण : येथील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नियोजित अश्वारूढ पुतळ्याचे आगमन साेमवारी शहरात झाले. भव्य मिरवणुकीद्वारे हा पुतळा आण्ण्यात आला. सकाळी चितेगाव येथून या पुतळ्याच्या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. आ. संदिपान भुमरे, जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्या उपस्थित या पुतळ्याचे चितेगाव, बिडकीन, पिंपळवाडी या ठिकाणी स्वागत केले.

पारंपरिक पद्धतीत निघून ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आण्यात आली. या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसहनंदु अण्णा काळे, दादा बारे, सोमनाथ परदेशी, जितसिंग करकोटक, भुषण कावसनकर, नामदेव खराद, शहादेव लोहारे, कृष्णा मापारी, किशोर तावरे, सचिन उंडाळे, शेखर शिंदे, सुनील हिंगे, बादशहा परळकर, कपिल पहिलवान, राजु गायकवाड, विजय सुते, शेखर दाभाडेसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
अठरा लाख रुपये खर्चाचा पुतळा : पैठण येथील बहूचर्चित छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नियोजित अश्वारूढ पुतळ्याचे आगमन साेमवारी झाले. १८ लाख रुपये खर्च करुन हा पुतळा छत्रपती चौकात बसवला जाणार आहे.

पैठण - आपेगाव विकास प्राधिकरणातुन सुशोभीकरणासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून सुशोभीकरण केले. चाबुतऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर बसवला. पुतळ्यासाठी लागणारा निधीभुमरे यांनी उपलब्ध करून दिला. येथील मूर्तीकार सोळुंके व स्वाती सोळुंके १२ फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...