आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला; 14 तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. अखेरीस त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. 

उदयनराजेंनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याच चर्चा सुरु होती. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीनंतर उदयनराजेंचं मनपरिवर्तन होईल आणि ते भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे. इतर माध्यमांनी देखील असे वृत्त दिले आहे. 

दरम्यान, उदयनराजे 14 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी साताऱ्यात येत असलेल्या महा जनादेश यात्रेत ते सामील होणार असल्याचंही बोलले जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला आणखी मोठा जबर धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...