आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड: अश्लील सीडी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तुरुंगात; जामीन न घेतल्याने झाली होती अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- छत्तीसगडचे मंत्री राजेश मुणत यांच्याशी संबंधित अश्लील सीडी प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांना अटक करण्यात आली. त्यांची सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) न्यायालयात बघेल यांच्यासह सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. बघेल यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. 


याआधी न्यायालयाने बघेल यांना जामीन देण्यास सांगितले होते. ते म्हणाले, मला या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवल्याच्या कारणावरून माझ्या विरोधात घाईघाईने आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अन्य पाच अारोपींपैकी पत्रकार विनोद वर्मा व विजय भाटिया न्यायालयात हजर झाले. त्यांना जामीन मिळाला. पत्रकार विनोद वर्मावर मंत्र्यांशी संबंधित सेक्स सीडीसाठी ब्लॅकमेलिंग व खंडणीचा आरोप होता.

बातम्या आणखी आहेत...