आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचला उमेदवार, पण त्याने आणलेली पिशवी पाहून अधिकाऱ्यांना फुटला घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवर्धा - छत्तीसगडमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येथील कवर्धामध्ये एक अपक्ष उमेदवार सुनील साहू उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डिपॉझिटच्या रकमेपोटी 10 हजार रुपयांची चिल्लर घेऊन आला. या नाण्यांनी भरलेली थैली घेऊन तो निवडणूक कार्यालयात पोहोतला. ते पाहून अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. 1 रुपयाचे तीन हजार, 2 रुपयाचे तीन हजार, 5 रुपयांचे 2 हजार आणि 10 रुपयांचे 2 हजार किमचीचे नाणे होते. 


मोजायला लागले तीन तास 
एवढे कॉइन पाहून फॉर्म देण्यासाठी बसलेल्या अधिकाऱ्यांचे डोकेच चक्रावले. ते पैसे घ्यायला नकारही करू शकत नव्हते. तरीही त्यांनी आधी उप-निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि नंतर नाणी मोजू लागले. ही नाणी मोजायला त्यांना 3 तास लागले. 

बातम्या आणखी आहेत...