आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळ गाठून काठावर पोहोचण्याची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये बस्तरच्या जागेसाठी मतदान झाले आहे. परंतु उर्वरीत 10 जागांसाठी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.विशेषत: पाच जागा अशा आहेत की जेथील लढती अतिशय रंगतदार बनल्या आहेत. महासमुंद, कोरबा, बिलासपूर, दुर्ग आणि कांकेरमध्ये आता ‘मॅनेजमेंट’चा बोलबाला असेल.

तसे तर राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. विरोधाचा तळ गाठला गेल्यानंतर आता काठावर येण्यासाठी दिग्गजांचा संघर्ष सुरू आहे. 10 एप्रिलरोजी बस्तरमध्ये मतदान पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या संकेतांमुळे भाजपच्या गोटात उत्साह दुणावला आहे.परंतु या उत्साहात राज्यांतील पाच जागांची चिंतादेखील दडलेली आहे. उदाहरणार्थ महासमुंदमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी भाजपसाठी मोठी डोकेदुखी निर्माण केली आहे. जोगींचा प्रभाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी 11 एप्रिल रोजी धमतरीच्या सभेत भाजपचे उमेदवार चंदूलाल साहू यांचे नाव घेऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. महासमुंदशिवाय कांकेरमध्येही रंगतदार लढतीचे चित्र आहे. काँग्रेसच्या आरंभीच्या उत्साहावर काँग्रेस पदाधिकार्‍यांनीच विरजण घातले आहे. अशाच प्रकारे दुर्गमध्ये भाजपच्या उमेदवार सरोज पांडे यांना काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून रसद मिळत असल्याने भाजप नेत्यांचे चेहरे खुलले आहेत. बिलासपूर व कोरबा मतदारसंघातही भाजप आता पूर्वीपेक्षा दुप्पट क्षमतेने कामाला लागली आहे.

विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ज्या प्रकारे भाजपने व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर काँग्रेसवर आघाडी मिळवली होती, तशाच रणनीतीअंतर्गत लोकसभा निवडणुकीत नियोजनपूर्वक पुढे जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे रणनीतीकार यावेळी छत्तीसगडमध्ये चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा ठेवून आहेत. याच कारणामुळे राहुल गांधी यांनी येथे आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत. तिसर्‍या टप्प्यासाठी 17 एप्रिल रोजी राहुल यांची पुन्हा येथे सभा होईल. गेल्या निवडणुकीत राहुल यांनी छत्तीसगडमध्ये अवघी एक सभा घेतली होती. एकूण काँग्रेसही येथे आधीपेक्षा जास्त परीर्शम करत आहेत.

लेखक छत्तीसगडचे संपादक आहेत.