आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhattisgarh Naxal Encounter News In Marathi, Election

नक्षल्यांच्या हल्ल्यात निवडणूक कर्मचाऱ्यासह \'सीआरपीएफ\'चे 3 जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात 'सीआरपीएफ'च्या तीन जवानांसह एक निवडणूक कर्मचारी शहीद झाले आहेत. या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मतदारसंघात सोडल्यानंतर 'सीआरपीएफ'चे जवान परत येत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर जोरदार गोळीबार केला. यात तीन जवानांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांची नेमकी संख्या अद्याप समजलेली नाही.
सुखमा जिल्ह्यात उद्या (गुरुवार) मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तावर ठेवण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा घातपात करण्याची माओवादी आणि नक्षलवाद्यांची योजना आहे, असा इशारा यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे.