आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात 10 जण ठार, देवी दर्शनाहून परतत होेते, एकाच कुटुंबातील सर्वांचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुआपाडाजवळ रात्री उशिरा अपघात, मृतांमध्ये दांपत्य व दोन मुलेही सामील.
कोमना येथील माता मंदिरातून दर्शन करून परतत होते.
सांकराचे भाजप मंडळ अध्यक्ष सुरजित सिंह ठार.

 

महासमुंद - ओडिशाच्या नुआपाडामध्ये मंगळवारी रात्री ट्रक अन् जीपच्या धडकेत 10 जण ठार झाले आहेत. जीपमध्ये स्वार सर्व ओडिशाच्या कोमना येथून देवीदर्शन करून परतत होते. या अपघातात पति-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचे पूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे.

मृतांमध्ये सर्व छत्तीसगडच्या महासमुंदचे रहिवासी होते. मृतांमध्ये जीपचा ड्रायव्हरही सामील आहे. मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी नुआपाडाच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

अशी आहे मृतांची नावे : 
बल्दीडीहचे रहिवासी डॉ. दिनेश डडसेना, त्यांच्या पत्नी चांदनी डडसेना, त्यांची दोन मुले भारती आणि धनंजय, सांकराचे भाजप मंडळ अध्यक्ष सुरजीतसिंह पप्पू, बल्दीडीहच्या सरपंचांचे पती मेघनाथ निशाद, अंसुलाचे रहिवासी मुकेश अग्रवाल, सांकराचे घनश्याम नेताम आणि त्यांच्या बहीण दिलेश्वरी नेताम. 

 

Chhattisgarh: Ten people died after a car collided with a truck in Mahasamund last night pic.twitter.com/hNvoTfTeyd

— ANI (@ANI) October 17, 2018

 

 

 

बातम्या आणखी आहेत...