आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या पुण्यातील तरुणाचा छत्तीसगड पोलिसांनी लावला शोध, माओवाद्यांचा कमांडर झाल्याचे समोर आले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातून 9 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर पत्ता लागला आहे. हा बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर झाल्याची माहिती छ्त्तीसगड पोलिसांनी दिली आहे. या धक्कादायक माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे तरुणाचे नाव आहे. 2010 मध्ये संतोष घर सोडून गेला होता, त्यानंतर 2011 साली कुटुंबीयांनी पुण्यातील खडक पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती.


संतोष हा 9 वर्षांपूर्वी पुण्यातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्यावेळेस त्याचा शोध घेतला होता पण कुठेच काही माहिती मिळाली नाही. पण आता तब्बल 9 वर्षानंतर पुण्यातून बेपत्ता झालेल्या संतोषचा शोध छत्तीसगड पोलिसांनी लावला. संतोष सध्या माओवादी संघटनेत काम करत असून, रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा तो ड्युटी कमांडर आहे.


छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे, त्यानुसार ते माओवाद्यांच्या शोध घेत आहेत. तसेच त्यांच्याशी संबधित माहितीचा तपास करत आहेत. संतोषबद्दलची सर्व माहिती छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांच्या यादीत स्पष्टपणे मांडली आहे. संतोष पुण्यातील कासेवाडी, भवानी पेठचा रहिवासी होता. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी खडक पोलिस स्टेशनमध्ये 2011 रोजी तक्रारही दाखल केली होती. पण आता त्याचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.