आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh's 38 Elephants Have Been Stayed In Bandhgad Tiger Reserve Of Madhya Pradesh From Eight Months

मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात छत्तीसगडचे ३८ हत्ती ८ महिन्यांपासून तळ ठोकून, गजहट्टापुढे वनाधिकाऱ्यांनी हात टेकले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहडोल- उमरिया - मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात गेल्या आठ महिन्यांपासून छत्तीसगडच्या हत्तींनी मुक्काम ठोकला आहे. त्यांना हुसकावून लावण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु हा प्रकल्प त्यांना आवडल्याने ते हटायला तयार नाहीत. हे ३८ हत्ती डेरेदाखल आहेत. हत्ती मजेत आहेत. परंतु गजहट्टामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे हत्तींच्या देखभालीची सोय-सुविधा येथे नाही. जंगली हत्तींमुळे व्याघ्र प्रकल्पात काही ठिकाणी एक महिन्यापासून पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. बीटीआरच्या अधिकाऱ्यांच्या मते, छत्तीसगडचे हत्ती दोन वेगवेगळ्या कळपाने येथे आले होते. पहिल्या कळपात २७ हत्ती तर दुसऱ्या कळपात ११ हत्ती आले होते. त्यांच्याशिवाय हत्तींच्या दोन पिलांचाही याच वन क्षेत्रात जन्म झाला. त्यामुळे प्रजननाच्या दृष्टीने हत्तींसाठी हे क्षेत्र अनुकूल असल्याचेही मानले जाते. खेतौलीजवळून उमरार नदी वाहते. येथे हत्ती पाणी पिण्यासाठी येतात. खेतौलीजवळ ३० तर पनपथाच्या जंगलात १० हत्तींचा वावर आहे. शहडोल सर्कलचे अधिकारी ए.के. जोशी म्हणाले, पश्चिम बंगालच्या वन अधिकाऱ्यांच्या मदतीने या ४० हत्तींची देखभाल कशी करावी यासंबंधीची योजना  आहे. 

 

 मुक्काम का? : गर्द हिरवी झाडी,  पाणी! 

पनपथाचे रेंजर वीरेंद्र ज्योतिषी म्हणाले, बांधवगड प्रकल्पात बहुतांश वन क्षेत्र हे बांंबूचे आहे. हत्तींना बांबूची पाने प्रिय असतात. त्याशिवाय गर्द हिरव्या वनस्पतींचेही प्रमाण जास्त आहे. पाण्याचीदेखील उपलब्धता आहे. त्यामुळेच बहुधा हत्तींनी मुक्काम ठोकला असावा. छत्तीसगडच्या जंगलात त्यांना परतावे वाटत नसावे. त्याशिवाय या व्याघ्र प्रकल्पात गोंगाटही नाही. छत्तीसगडच्या वन क्षेत्रात कोळशाची खाण आहे. तेथील यंत्रांच्या आवाजाने हत्तींनी वास्तव्याचे ठिकाण बदलले असावे.