आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhindam, Who Made Objectionable Statements Against Shivarai, Prepares For Assembly, Nomination Forms Taken From The Collector's Office

शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या छिंदमची विधानसभेसाठी तयारी, जिल्हाधिकारी कार्यालयातून नेला उमेदवारी अर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादात अडकलेल्या नगरमधील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आक्षेपार्ह विधान केल्यामुळे काही दिवस तडीपार झाल्यानंतर नगर महापालिकेच्या निवडणुकीत तो परत निवडून आला. आता त्याने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने उमेदवारी अर्जही नेला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लील शब्द वापरल्याने सर्वच स्तरातून छिंदमवर जोरदार टीका झाली. शिवप्रेमींनी छिंदमला चोपही दिला होता. त्यानंतर सुरक्षेमुळे काही दिवस त्याची नगर मधून हकालपट्टीही करण्यात आली. पण, काही दिवसानंतर छिंदम परत राजकारणात सक्रीय झाला. दरम्यान, छिंदमला कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पण, छिंदमने नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच विधानसभेची निवडणूकही अपक्ष लढण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...