आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात येताच 'घुसखोर' पाहून घाबरली महिला पोलिस; शूट केल्यानंतर कळाले हे घरच आपले नाही! आता झाली ही कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - अमेरिकेतील टेक्सस प्रांतात एक अजब घटना समोर आली आहे. शिकागो पोलिस विभागात कार्यरत असलेली महिला अचानक घरी आली तेव्हा तिला घरात एक संशयास्पद माणूस दिसून आला. फ्लॅटमध्ये आंधार असल्याने आपल्या घरातील कथित घुसखोरापासून वाचण्यासाठी तिने गन काढली. यानंतर त्या अनोळखी व्यक्तीचा सामना होताच त्याला गोळ्या घालून ठार मारले. यानंतर जे घडले त्यावर महिला पोलिस सुद्धा शॉक झाली. घराच्या लाइट ऑन करताच हे फ्लॅट आपले नाही असे तिला कळाले. सोबतच आपण ज्या व्यक्तीला घुसखोर समजून शूट केले तो त्या घराचा मालक होता असेही तिच्या लक्षात आले. प्रत्यक्षात ती आपले घर समजून दुसऱ्या फ्लॅटमध्ये गेली होती. 


पोलिस सेवेतून बाद, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी शिकागो पोलिसांतील महिला पोलिस अधिकारी अॅम्बर गायजर (30) आपल्या शिकागोतील फ्लॅटच्या इमारतीमध्ये गेली होती. परंतु, आपल्या फ्लॅटमध्ये जाणे विसरून ती दुसऱ्याच एका फ्लॅटमध्ये गेली. तिला तो फ्लॅट आपलाच असल्याचे वाटत होते. त्यामुळे, घरात असलेला बोथॅम शीन जीन हा युवक तिला घुसखोर असल्याचा भास झाला. तिने घाबरून बोथॅमला शूट करून ठार मारले. 
- वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. त्याच समितीने घेतलेल्या सुनावणीनंतर अॅम्बरला बेजबाबदार अधिकारी ठरवण्यात आले. तसेच तिला नोकरीवरून कायमचे काढून हत्येचा खटला दाखल करण्यात आला आहे. अॅम्बर श्वेत आणि पीडित बोथॅम हा अश्वेत होता. अमेरिकेत वर्णद्वेषी हत्यांचे प्रमाण वाढत असताना या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच आरोपी महिलेच्या विरोधात कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...