आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील रुग्णालयात बेछूट गोळीबार: हल्लेखोर आणि पोलिसांसह 4 जणांचा मृत्यू; 2 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - अमेरिकेतील शिकागो शहरात मर्सी रुग्णालयावर गोळीबार झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्लेखोराने 20 गोळ्या झाडल्या. यास प्रत्युत्तर देत पोलिसांनी हल्लेखोराला ठार मारले. परंतु, तोपर्यंत डॉक्टर, पोलिस आणि हल्लेखोरासह एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. सोबतच दोन जण जखमी झाले आहेत. सध्या रुग्णालय रिकामे करण्यात आले असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


याच रुग्णालयात होती हल्लेखोराची प्रेयसी...
अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, सोमवारी रात्री शिकागो येथील मर्सी रुग्णालयात एक सशस्त्र हल्लेखोर घुसला. त्याने सर्वप्रथम रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या आपल्या प्रेयसीला गोळ्या झाडून ठार मारले. यानंतर बेछूट फायरिंग सुरू केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की "पोलिसांनी प्रत्युत्तर दिले यानंतर हल्लेखोर जमीनीवर कोसळला. परंतु, तो पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला की त्याने आत्महत्या केली याबाबत अजुनही संभ्रम आहे." या हल्ल्यात हल्लेखोराची प्रेयसी, तिची मैत्रिण आणि हल्लेखोरासह एका पोलिस जवानाचा मृत्यू झाला. यात कुठल्याही रुग्णाला दुखापत झालेली नाही.


गोळीबाराच्या घटनांत वर्षभरात 12 हजार मृत्यू
अमेरिकेत गन कल्चरवर वाद सुरू असताना दिवसेंदिवस माथेफिरुंच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. 'दन गन व्हॉयलेन्स आर्काइव्ह'च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 1 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत गोळीबाराच्या 48,959 घटना घडल्या आहेत. यामध्ये तब्बल 12,476 मृत्यू आणि 24,236 लोक जखमी झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...