आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात झाली फायरिंग, हल्लेखोराने आपल्या नातेवाइकासह 2 जणांवर झाडल्या गोळ्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेच्या शिकागो शहरातील मर्सी रुग्णालयात सोमवारी झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आधी रुग्णालयात आला आणि त्याने एका महिलेला गोळी मारली. ती महिला आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या एका महिलेला आणि पोलिसाला गोळी मारली.


पोलिस अधीक्षक एडी जॉन्सन यांनी सांगितले की, ‘‘पोलिसांनीही आरोपीच्या फायरिंगला प्रत्युत्तर दिले. आम्हाला हे माहिती नाही की, तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला की त्याने स्वत:वरच गोळी झाडून घेतली. हल्ल्यात सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. पोलिसांना या हल्ल्यामागचे कारण अजून समजले नाहीय. एका स्थानिकाने सांगितले की, त्याने कमीत कमी 20 गोळ्यांचा आवाज ऐकला. 

 

बातम्या आणखी आहेत...