आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआय प्रमुखांवर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी असलेल्या समितीतून सरन्यायाधीश गोगाई बाहेर; एका आठवड्यात देणार निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हायप्रोफाईल निवड समितीच्या सदस्यत्वातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई बाहेर पडले आहेत. सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांना पुन्हा सीबीआयच्या संचालकपदी विराजमान करण्याचा निर्वाळा दिला. सोबतच, केंद्र सरकारने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश सुद्धा रद्द केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जारी केलेल्या निकालात एका आठवड्याच्या आत हायप्रोफाईल निवड समितीवर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविली होती. गोगोई हा निकाल देणाऱ्या खंडपीठातील एक न्यायाधीश होते.


हायप्रोफाईल निवड समितीमध्ये पंतप्रधान, सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नेमलेला प्रतिनिधी इत्यादींचा समावेश असतो. या समितीला आलोक वर्मा यांच्या पद आणि जबाबदारीवर एका आठवड्याच्या आत निर्णय घ्यायचा आहे. सीबीआय प्रमुख म्हणून वर्मा यांना पुन्हा जबाबदारी आवश्य देण्यात आली. परंतु, आलोक वर्मा यांना सीबीआयचे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्याच बाबीवर अंतिम निर्णय ही समिती घेणार आहे. रंजन गोगोई यांनी आपल्या जागी या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. सिकरी यांना दिली आहे. या बैठकीचे अध्यक्ष स्थान पंतप्रधान मोदी भूषवणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...