आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडले, केंद्राकडे पाठवला प्रस्ताव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारकडे नवीन सरन्यायाधीशांच्या पदासाठी न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. सु्त्रांच्या माहितीनुसार रंजन गोगाई यांनी केंद्राला एक पत्र लिहून ही माहिती दिली. रंजन गोगाई 17 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. 

कोण आहेत शरद बोबडे?
शरद बोबडे यांचा जन्म 1956 मध्ये झाला. त्यांनी नागपूर येथूल एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे. 1978 मध्ये ते बार काउंसिलचे सदस्य बनले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टीस करण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. 2012मध्ये ते मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्ययाधीश बनले. तर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. शरद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...