आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धूवर कारवाईची टांगती तलवार, लोकसभा निवडणिकीनंतर होणार निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड(पंजाब)- कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धूंच्या वक्तव्यांमुळे पंजाब काँग्रेसचे बहुतेक मंत्री त्यांच्याविरूद्ध झाले आहेत. पंजाब प्रकरणाताली प्रभारी आशा कुमारीदेखील सिद्धूमुळे नाराज आहेत. त्यांनी सांगितले, "प्रदेश अध्यक्ष सुनील जाखड यांच्याकडून रिपोर्ट मागितली आहे. अनेकवेळा पक्षाची प्रतिमा मलीन झालेली आहे. ही प्रकरणे राहुल गांधींच्या नजरेसदेखील पडली आहेत. यावर कारवाईतर नक्की होणार आहे, पण अंतिम निर्णय निवडणुकींच्या निकालानंतर होईल." 


सूबेच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी सिद्धूवर कारवाईची करण्याची मागणी केली आहे. सोमवारी कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, साधू सिंग धर्मसोत यांनीदेखील सिद्धूंच्या वक्तव्यांना बिनबुडाचे आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, जर सिद्धू एखाद्या गोष्टीवर नाराज असतील तर, सार्वजनिक ठिकाणी यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. 


सिद्धू आपल्या गोष्टीवर ठाम आहेत
सिद्धूंचे म्हणने आहे की, त्यांनी जे काही सांगितले आहे, ते आत्म्याशी आहे. गुरू ग्रंथ साहिबवर टीका करणे म्हणजे पंजाबच्या आत्म्याला ठेस लागण्यासारखे आहे. यामुळे सर्व शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सिद्धूंनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले- "त्या लोकांना ठोका, जे लोक काँग्रेसच्या पाठीत खंजिर खूपसत आहेत."


3 मंत्र्यांच्या निशान्यावर सिद्धू
कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले, "आता कॅप्टन सरकार पक्षाविरूद्ध गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. एसआयटीने आरोपी पोलिस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे, पण सिद्धू विनाकारण आरोपींना शिक्षा दिली जात आहे असा सरकारवर आरोप करत आहेत." रंधावा म्हणाले- 2015 मध्ये जेव्हा गुरू ग्रंथ साहिबचा अपमान करण्यात आला होता, तेव्हाच सिद्धूंनी राजीनामा का दिला नाही. तेव्हा सिद्धू भाजपात होते आणि त्यांची पत्नीदेखील आमदार होते. सिद्धूंनी निवडणूकांच्या मध्येच विधाने केली होती आणि ते अत्यंत चुकीचे आहे.


पत्नीला न मिळ्याल्यामुळे नाराज 
नवजोत सिंग सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी आरोप लावला आहे की, अमरिंदर सिंगमुळेच त्यांना अमृतसरचे निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. याठिकाणावरून त्यांच्या ऐवजी माजी रेल्वे मंत्री पवन बंसल यांना तिकीट देण्यात आले. त्या म्हणाले अमरिंदर सिंग आणि पार्टी महासचिव पंजाब प्रभारी आशा कुमारी या दोघांमुळे मला तिकीट मिळाले नाही. 

बातम्या आणखी आहेत...