आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chief Minister Claims 50,000 Hectares Of Irrigation Through Gosikhurd Project, Farmers Say 'it Never Reached To Us'

गोसीखुर्द प्रकल्पातून 50 हजार हेक्टर जलसिंचन केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा, शेतकरी म्हणतात- 'आमच्या पर्यंत पोहोचलेच नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच्या महाजनादेश यात्रेला अमरावतीतील मोझरीमधून सुरुवात झाली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा पाढा वाचला. पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी केलेली विकास कामे सांगितली, यावेळी त्यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून 50 हजार हेक्टर जलसिंचन केले, शिवाय मागील पाच वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन दिले. 20 हजार कोटींची सिंचनाची कामे केली, असल्याचे सांगितले. पण या सभेत उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी त्यांच्या हा दावा फेटाळून लावला आहे. शेतकरी म्हणाले की, जलसिंचनाचा काहीच लाभ त्यांना मिळालेला नाहीये.