आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chief Minister Devendra Fadanvis Rally In Yawatmal, Dicided Third Minister In His Upcoming Cabinet

'निलय भाऊ विधानसभेत आमदार म्हणून जातील आणि येताना मंत्री म्हणून येतील', मुख्यमंत्र्यांनी आगामी मंत्री मंडळातील तिसरा मंत्री ठरवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या आगामी मंत्री मंडळताली तिसरा मंत्री ठरवला आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधी कर्जत जामखेड मतदारसंघातील राम शिंदे यांना तर माण-खटाव मतदारसंघातील जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता आज यवतमाळमध्ये पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी पुसद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निलय नाईक यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली आहे. विशेष म्हणजे निलय नाईक यांची लढत त्यांचेच चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्याशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची यवतमाळमध्ये सभा पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "जर तुम्ही निलयभाऊंना विधानसभेत पाठवलं तर, माझा शब्द आहे की मी निलय भाऊला मंत्री बनवणार. तुम्ही निलयभाऊंना विधानसभेत पाठवा. जाताना निलय भाऊ आमदार म्हणून जातील आणि येताना मंत्री म्हणून येतील." असे फडणवीस म्हणाले.
त्यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. नाईक आधी राष्ट्रावादीमध्ये होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात येताच भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. निलय नाईक हे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. पण, तरीही ते आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. यवतमाळमधील पुसद मतदारसंघात इंद्रनील नाईक(राष्ट्रवादी) विरुद्ध निलय नाईक(भाजप) या चुलत भावात थेट लढत होत आहे. विशेष म्हणजे हे दोघे चुलत भाऊ आहेत आणि दिवंगत वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...