Home | Maharashtra | Mumbai | Chief minister devendra fadnavis talk about mumbai rain in assembly

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले निवेदन, म्हणाले- 'अतिक्रमण झालेल्या ठिकाणी, नदी नाल्याच्या बाजूची बांधकामे याबाबत कडक भूमिका घेण्यात येईल'

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 02, 2019, 01:58 PM IST

छगन भुजबळ यांनी मालाड दुर्घटनेप्रकरणी जी एसआरएच्या चौकशीची मागणी केली

 • Chief minister devendra fadnavis talk about mumbai rain in assembly

  मुंबई- मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. मुंबईतील झोपडपट्ट्यांवर कडक भूमिका घ्यावा लागतील. काही लोकांना त्रास होईल, पण दुर्घटना टाळण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिक्रमणे झालेल्या ठिकाणी, नदी नाल्याच्या बाजूची बांधकामे याबाबतही कडक भूमिका घेण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

  राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मालाड दुर्घटनेप्रकरणी जी एसआरएच्या चौकशीची मागणी केली आहे, ती निश्चित केली जाईल. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून, नालेसफाईचा आढावा घेतला जाईल. वेळेच्या आत नालेसफाई झाली पाहिजे हे तथ्य आहे. नालेसफाईबाबत जे धोरण आहे, त्याबाबत महापालिकेकडून आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  मुंबईत आतापर्यंत 20 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
  गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले. दरम्यान मुंबईतील मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 20 फूट उंच भिंत पडून 18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका 3 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

Trending