आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडींगदरम्यान चिखलात चाके रुतली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत परत एकदा हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पेणमधील हेलिपॅडवरील चिखलात रुतल्याने ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतहून हेलिकॉप्टरने रायगडमध्ये आले. हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे उरताना हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. 
देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पेणमध्ये अपघात झाला. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण मिळवले आणि पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते. दरम्यान, कोणालाही काही दुखापत झालेली नाहीये.

बातम्या आणखी आहेत...