आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनादेश यात्रेदरम्यान वाहनावरूनच मुख्यंमंत्र्यांचे शिवाजी महाराजांना वंदन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- भाजपची महाजनादेश यात्रा सुरू आहे. ही यात्रा धुळ्यात आली, यावेळी महाजनादेश यात्रेच्या वाहनावरून न उतरताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी वाहनाखाली उतरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 15 मिनिटांच्या रोडशोमध्ये शंभर वाहनांचा समावेश होता. त्यातील चार वाहने महाजनादेश यात्रेची होती. उर्वरित ताफा पोलिस व नेत्यांच्या वाहनांचा होता.

धुळे शहरात बुधवारी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील आग्रारोडवरुन रोड शोला प्रारंभ केला. त्यापूर्वी 5 वाजता विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी थेट चाळीसगाव रोड चौखुलीवरील शिवाजी महारांच्या पुतळ्या नजीक रोड शोला हजेरी लावली. यावेळी सफारी वाहनातून उतरलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाजनादेश यात्रेच्या वाहनाकडे कूच केली. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पतळ्याला पुष्पहार अर्पण केला नाही. वाहतानातूनच त्यांनी शिवपुतळ्याला दोन्ही हात जोडत वंदन केले. त्यानंतर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शिवाजी महाराजांच्या पतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर तडक रो शो सुरू झाला. 

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनापुढे महिलांची दुचाकी रॅली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे यात्रेच्या वाहनावर उभे होते. तिथूनच नागरिकांना हात देत मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांचे अभिवादन स्वीकारले. वाहनावरच फेकलेले हारतुरेच स्वीकारत वेगाने यात्रेचे वाहन पुढे नेण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा फारशी गर्दी दिसली नाही. जमलेल्या लोकांनाही बाहेर काढायचे काम पोलिस यंत्रणा करत होती. देवपूरकडे जातांना मोठा पूल ओलांडल्यानंतर एका मिनिटासाठी मुख्यमंत्र्यांचे वाहन थांबवि‌ण्यात आले. त्यानंतर वेगानेच हा रोड शोचा ताफा नगावबारीकडे गेला.