आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकांची राहण्याची इच्छा नाहीये, याचे आत्मचिंतन शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने करावे.'- देवेंद्र फडणवीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- "निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारीला लागतात. त्यानुसार विविध पक्षातील नेते पक्षांतर करत असतात. पण काही नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यांना ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करत धमकावले जात आहे. तसेच त्यांच्यावर दडपण आणून राजकीय सत्तेचा गैरवापर केला जातोय अशी टीकाही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती."

 

तसेच, पक्ष सोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना धमकावले जात आहे. धमकी देण्यासाठी राज्य बँकेचाही वापर केला जात असल्याचेही खळबळजनक वक्तव्य पवारांनी केले. तसेच संस्था चालकांवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे सत्तेचा इतका टोकाचा गैरवापर होताना आतापर्यंत मी पाहिलेला नाही असेही टीका शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.


पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकांची राहण्याची इच्छा नाहीये, याचे आत्मचिंतन शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने करावे." असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्यासोबतच "विरोधी पक्षाला आमचे आकर्षण आहे, त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत, पण त्यातील काही निवडक लोकांना आम्ही पक्षात घेऊ. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आमच्याकडे येण्यास तयार आहेत. पण यात ज्या लोकांची ईडीची चौकशी सुरु आहे अशा लोकांना आम्ही पक्षात घेणार नाही. तसेच अशा लोकांची आम्हाला गरजही नाही अशी टीका त्यांनी केली.'' असे मुख्यमंत्री म्हणाले.