आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- शहरातील रस्त्यांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी १२५ कोटी व पुन्हा सत्तेत आल्यास आणखी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी औरंगाबादेत केली. मात्र, हा पैसा तरी वेळेत वापरा, असा सल्लाही त्यांनी महापालिकेच्या कारभाऱ्यांना दिला.
शासनाने १८ महिन्यांपूर्वी दिलेल्या १०० कोटी रुपयांतून होणाऱ्या रस्ते कामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. नागपूरच्या तुलनेत औरंगाबादला सरकारने तुटपुंजा निधी दिला. प्राप्त निधीचाही मनपाने तातडीने वापर केला नाही, असे वृत्त 'दिव्य मराठी'ने ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले. त्याच संदर्भात आमदार सुभाष झांबड म्हणाले की, आधीचे ६ महिने कोणत्या रस्त्यांची कामे करायची हे ठरवण्यात गेले, नंतरचे ६ महिने हे काम कोणाला द्यायचे यात गेले व पुढे कोर्टात दिवस वाया गेले.
त्यावर फडणवीस म्हणाले, विलंब झाला हे खरे आहे, परंतु शहराचा विकास झाला पाहिजे. यापूर्वी १२५ कोटी रस्त्यांसाठी दिले होते. निवडणुकीपूर्वी पुन्हा तेवढेच पैसे देऊ. जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा सरकार आले तर आणखी १०० कोटी मिळतील. सरकार पैसे देईल पण ते वेळेत खर्च झाले पाहिजे. त्याच्या कोर्ट कचेऱ्या होणार नाहीत, यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
बाजार समित्यांमुळेच हमीभाव मिळत नाही
केंद्राने दीडपट हमीभावाची घाेषणा करूनही राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याची टीका हाेत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे खापर बाजार समित्यांवर फाेडले आहे. 'काही बाजार समित्यांच्या कारभारामुळेच हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही', असा ठपका त्यांनी ठेवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.