आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरमधून मुख्यमंत्र्यांनी तर कामठीमधून बावनकुळे यांच्या पत्नीने दाखल केला उमेदवारी अर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उमेदवारी अर्ज भरण्याची शनिवारी शेवटची तारीख असल्याने आज अनेकजण आपले अर्ज भरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. नागपूरसह राज्यात भाजप विक्रमी मतांनी विजयी होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. 

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी
दरम्यान सकाळीच चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांच्याऐवजी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. या पार्श्वभूमीवर जी बाब एकनाथ खडसेंच्या बाबतीत झाली, तीच बाब चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत देखील घडल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्योती बावनकुळे यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र अर्ज दाखल करतेवेळी चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पत्नीसोबत हजर नव्हते. त्यामुळे यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत