आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील वैद्यकीयच्या जागा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांकडे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना दिलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केंद्रीय अाराेग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. तसेच  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.


केंद्रात दुसऱ्यांदा माेदी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच दिल्लीत गेले हाेते. पक्षातील ज्येष्ठ नेते व नूतन मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. भेट घेतलेल्या सर्व मंत्र्यांकडे त्यांनी महाराष्ट्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नही मांडले.


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन दिले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या ८१३ जागा तर पदवी शाखांमध्ये १७४० जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.


अमित शहा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतानाच मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती त्यांना दिली