आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chief Minister Of Andhra Pradesh Jagan Mohan Reddy Reverses Naidu Government Order About CBI

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय; सीबीआयला आंध्र प्रदेशात खुल एंट्री, चंद्राबाबूंनी घातली होती बंदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती(आंध्र प्रदेश)- सीबीआयला राज्यात प्रवेश बंदी केल्यामुळे चर्चेत आलेल्या आंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला परत एकदा एंट्री मिळणार आहे. नवनिर्वाचीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी याबाबतचा निर्णय घेत शासन आदेश जारी केला आहे. 8 नोव्हेंबर 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयवर आंध्र प्रदेशात येण्यासाठी बंदी घातली होती. सीबीआयच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून general consent दिली जाते, ही general consent चंद्राबाबूंनी काढून घेतली होती.


आंध्रा सरकारने नव्यानेच काढलेल्या आदेशानुसार, 8 नोव्हेंबर 2018 रोजी काढलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे, त्यामुळे आता सीबीआयला भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण अधिकार मिळाला आहे. 


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्यामुळे चंद्राबाबूंच्या टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सीबीआयमध्ये अंतर्गत वाद समोर आल्यानंतर पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशने सीबीआयच्या एंट्रीवरच बंदी घातली. शिवाय केंद्र सरकारकडून सीबीआयचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात येत असल्याचा आरोप चंद्राबाबूंनी केला होता.


विशेष म्हणजे चंद्राबाबू यांचे निकटवर्तीय असलेल्या अनेकांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. आंध्र प्रदेश सरकार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना संरक्षण पुरवणार नसल्याचंही चंद्राबाबूंनी म्हटले होते. आंध्र प्रदेशात सत्तांतर होताच पुन्हा एकदा सीबीआयला एंट्री मिळाली आहे.