मुंबई / आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एक ते दोन दिवसात खातेवाटप करणार  - मुख्यमंत्री

Dec 01,2019 09:09:00 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा पदभार हाती घेताच आरे कार शेडवर स्थगिती दिल्याची माहिती दिली होती. आता आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच एक ते दोन दिवसात खातेवाटप करणार असल्याचे ते म्हणाले. पहिले अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

हिंदुत्वाबाबत उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर

दरम्यान दिलेला शब्द पाळणे हेच आमचे हिंदुत्व असे म्हणत उद्धव यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फटकारले. उल्लेखनीय बाब म्हणजे, महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर दिवंगत शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांचा पोस्टरवर तसेच शपथविधीवेळीही 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख करणे शिवसेनेने टाळले.

X