आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा थांबवून कोल्हापुरला भेट द्यावी - राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोल्हापुरमध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरफ पथकाचे मदतकार्य करत असून अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रिम यांनी केली..
 

पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट राज्याच्या दौऱ्यावर आहेत. महाजनादेश यात्रेद्वारे ते जनादेश घेत आहेत. दरम्यान पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून कोल्हापुरमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. एनडीआरफच्या 2 तुकड्या बचावकार्य करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 85 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपली महाजनादेश यात्रा बाजुला ठेवून कोल्हापुरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी आ. हसन मुश्रिफ यांनी केली आहे. 
 

0