आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व विचारसरणीबाबत आपली भूमिका केली स्पष्ट, ते म्हणाले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानसभेत वेगळ्यात अंदाजात दिसून आले. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी तुम्हाला विरोधी पक्षनेता नाहीतर एक जबाबदार नेता म्हणणार आहे. तुम्ही जर आमच्यासोबत असता तर हे सर्व (युती तुटने) काही झाले नसते. मी देवेंद्र फडणवीसांकडून बरेच काही शिकलो आहे आणि आमच्यात नेहमी मैत्री राहील. हिंदुत्व विचारसरणीबाबत बोलताना ते म्हणाले की, मी आजही हिंदुत्व विचारसरणीसोबत आहे आणि पुढेही राहणार. गेल्या पाच वर्षांत मी सरकारला कधीही दगा दिला नसल्याचे उद्धव यावेळी म्हणाले. ज्यांना आम्ही विरोध केला ते आज आमच्यासोबत - उद्धव

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मी एक भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण ज्यांनी त्यांचा विरोध केला आज ते सोबत आहेत आणि जे आमच्यासोबत होते ते आज विरोधी बाकावर बसले आहेत. मी इथे येईन असे कुणाला कधीही म्हणालो नाही परंतु मी आलो. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. 

 

बातम्या आणखी आहेत...