बुलेट ट्रेन / मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेन प्रकरल्पाचे पुनरावलोकन करण्याचे दिले आदेश, पालघरमधील शेतकरी मात्र प्रकल्पाविरोधात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली

Dec 02,2019 02:00:34 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील अनेक गावातील शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास नकार दिला आहे. शिवसेनेनही अनेकवेळा सामनातून या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता.


उद्धव ठाकरे म्हणाले, "आमचे सामान्य माणसाचे सरकार आहे. मी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधात नाहीये, विकासाच्या आड कधीच येणार नाही. पण, सर्वांचचं ऐकून आम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रकल्पात राज्य सरकारलाही 25 टक्के भागीदारी द्यावी लागेल

बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या फंडिंगमध्ये राज्याच्या तिजोरीतून 25% रक्कम द्यावी लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकारने दावा केला आहे की, राज्य सरकारवर 5 लाख कोटींचे कर्ज असल्यामुळे, लवकरच सरकार राज्यातील आर्थिक स्थितीवर श्वेतपत्र आणेल.


2023 पर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे योजना

मार्च 2020 पर्यंत प्रोजेक्टचे काम सुरू करणे आणि डिसेंबर 2023 पर्यंत प्रोजेक्टचे काम पूर्ण करण्याची योजना केंद्राने आखली आहे. जापानच्या मदतीने होत असलेल्या या प्रोजेक्टसाठी जमिनीचे परीक्षण केले होते. गुजरात आणि महाराष्ट्रात बुलेट ट्रेन ज्या भागांवरुन जाईल, त्या भागातील जमिन अधिग्रहनाचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये. यासाठी एक डिझाइनदेखील तयार करण्यात आले आहे. अहमदाबादच्या साबरमतीपासून सुरजपूर जंक्शनच्या रेल्वे स्टेशनवरुन ही बुलेट ट्रेन जाईल. मल्टीलेवल पार्किंगची व्यवस्थाही यात असेल, तसेच काही भागात अंडर ग्राउंड टनल्स असतील.


3,000 हजार रुपयांपर्यंत असेल किराया

बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे एमडी अचल खरेने सप्टेंबरपर्यंत सांगितले की, बुलेट ट्रेनचा 3 हजार रुपयापर्यंत किराया असू शकतो. अहमदाबादवरुन मुंबई (508 किलोमीटर) दरम्यान बुलेट ट्रेन 12 स्टेशनवर थांबेल. या प्रोजेक्ससाठी आम्हाला 1380 हेक्टेयर जागेची गरज आहे.

X