आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीय बंधाच्या तुटून पडल्या गाठी... आता भेटीत तृष्टता मोठी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान माेदींचे पुण्यात स्वागत

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : पोलिस महासंचालकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीनंतर भाजप- शिवसेनेत सत्तास्पर्धेतून निर्माण झालेले राजकीय वितुष्ट राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींचे कारण ठरले. म्हणूनच मोदींच्या या दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या स्वागताला वेगळे राजकीय महत्त्व होते.
 

बातम्या आणखी आहेत...